Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सर्वसामान्यांना झटका ! घरगुती सिलिंडरच्या किमतीत तीन महिन्यांत 90 रुपये वाढ

Share

नाशिक । दिवाळीचा सण आटोपल्यावर विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सतत तीन महिन्यांंपासून या किमतीत वाढ होत असून गेल्या महिन्यांच्या तुलनेत यावेळी विनाअनुदानित सिलिंडरच्या (14.2 किलो) बाजार भावात 77 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात 596 रुपयांना मिळणार्‍या सिलिंडरसाठी आता 672.50 रुपये किंमत मोजावी लागत आहे.

विनाअनुदानित घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत गेल्या तीन महिन्यांंपासून वाढ होत आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांचा विचार केल्यास सुमारे 90 रुपयांची वाढ ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये हे सिलिंडर 567.50 रुपयांना मिळत होते. त्यात वाढ होऊन सप्टेंबरमध्ये 583 रुपये तर ऑक्टोबरमध्ये 596 रुपयांवर ही किंमत पोहोचली.

घरगुती सोबतच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीदेखील 119 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. दुकानदारांना हे सिलिंडर आता 1200.50 रुपयांना मिळणार आहे. तर पाच किलोच्या छोट्या सिलिंडरची किंमत या महिन्यात 55 रुपयांनी वाढून 355 रुपये इतकी झाली आहे.

जानेवारीपासून किमतीवर दृष्टीक्षेप

 • जानेवारी – 681.50 रुपये 121.21 रुपये घट
 • फेब्रुवारी – 651.06 रुपये 30.44 रुपये घट
 • मार्च – 694.39 रुपये 43.33 रुपये वाढ
 • एप्रिल – 699.10 रुपये 4.71 रुपये वाढ
 • मे – 705.00 रुपये 5.90 रुपये वाढ
 • जून – 730.00 रुपये 25.00 रुपये वाढ
 • जुलै – 630.00 रुपये 100.00 रुपये घट
 • ऑगस्ट – 567.50 रुपये 62.50 रुपये घट
 • सप्टेंबर – 583.00 रुपये 15.50 रुपये वाढ
 • ऑक्टोबर- 596.00 रुपये 13.00 रुपये वाढ
 • नोव्हेंबर – 672.50 रुपये 76.50 रुपये वाढ
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!