Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

राष्ट्रपती कोविंद १० ऑक्टोबरला जिल्हा दौऱ्यावर

Share

नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या १० ऑक्टोबरला नाशिक दौऱ्यावर येत असून यावेळी भव्य सोहळा तसेच परेडचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद सपत्नीक दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक येथील सरकारी विश्रामगृहावर ९ ऑक्टोबरला त्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर १० रोजी नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटर येथे राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात परेडचे नेतृत्व ब्रिगेडिअर सरबजीत सिंह बावा भल्ला करणार आहेत. तर भारतीय सेना आर्मी एव्हिएशन यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यातर्फे प्रेसिडेंट कलर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. च्या हस्ते

तसेच या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतील असे संकेत असून राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीत प्रशासनाकडून प्राथमिक तयारी होऊ लागली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!