Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन

Share

नाशिक । प्रतिनिधी
सन 2021 मध्ये देशात होणार्‍या जनगणनेत माहितीचे संकलन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहे. जनगणनेसाठी माहिती संकलनाच्या पद्धतीत अतिविशेष बदल प्रस्तावित करण्यात आले असून यासाठीच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालीम ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये होणार आहे.

जनगणना आयुक्त तथा भारताचे महानिबंधक यांच्या कार्यालयाकडून देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची अर्थात ‘जनगणना-2021’ची तयारी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने पुणे येथे यशदा संस्थेत 3 ते 11 जून या कालावधीत प्रशिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणावेळी राज्याच्या जनगणना संचालक रश्मी झगडे यांनी या प्रक्रियेविषयी माहिती दिली. सन 2021 च्या जनगणनेसाठी चाचणीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘जनगणना 2021’मध्ये प्रथमच माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने करण्याचे प्रस्तावित असून, त्याची चाचणी घेण्यात येणार आहे.

या माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने झाल्यास शासकीय धोरण ठरविण्यासाठी त्याचा उपयोग होईल, तसेच संशोधकांनाही आवश्यक तेव्हा जनगणनेची माहिती उपलब्ध होईल. जनगणना चाचणीचे प्रत्येक टप्प्यात बिनचूक काम झाल्यास प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धत सुनिश्चित करणे शक्य होणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!