Type to search

नाशिक

चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी अमेरिकेतील मित्रांसह घेतले त्र्यंबक राजाचे दर्शन

Share

नाशिक : नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी अमेरिकेतील यजमानांसह त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले.

नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार प्रा.प्रफुल्ल सावंत यांनी त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग या ठिकाणी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासह अमेरिकेतील मित्र परिवारही होता. प्रा. सावंत यांची अनेक चित्र प्रदर्शने देश व परदेशात गाजली आहेत. आतापर्यंत राज्य ते राष्ट्रीय असे एकूण ४० पुरस्कार तसेच सहा नामांकित कला शिष्यवृत्ती त्यांना मिळाल्या आहेत.

वयाच्या ३४ व्या वर्षांच्या आतच जागतिक पातळीवरील चित्रकला क्षेत्रातील नामांकित कलासंस्थांचे एकूण १६ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. अमेरिका, फ्रान्स, रशिया, जर्मन, पेरू, चीन, यूरोप अशा एक ना अनेक देशांमध्ये चित्रकलेच्या माध्यमातून तिरंगा फडकवलेला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!