Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दर्पण प्रोजेक्ट मुळे टपाल विभागाला मिळणार नवसंजीवनी

Share

सिन्नर : गत दीडशे वर्षापासून भारतीय डाक विभाग हा दळण वळण व्यवस्थेतील प्रमुख आधार बनलेला आहे. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात याची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे.

मोबाईल व इंटरनेट चा वाढता प्रभाव तसेच कुरियर कम्पनी यांच्या स्पर्धेचा सामना पोस्टाला करावा लागत आहे. यामुळेच पोस्टाने सुद्धा आपली जुनी कात टाकत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आयटी (IT) आधुनिकीकरण प्रोजेक्ट २०१२ अंतर्गत ग्रामीण भागातील असलेल्या १३ हजार पोस्ट ऑफिस ना सक्षम व आधुनिक करण्यासाठी दर्पण प्रोजेक्ट अमलात आणलेला आहे.

डिजिटल ऍडव्हान्समेन्ट ऑफ रूरल पोस्ट ऑफिसेस फॉर अ न्यू इंडिया (दर्पण) DARPAN अंतर्गत ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिस ला नव संजीवनी मिळणार आहे.मागील 6 महिन्यापुर्वीच या प्रोजेक्ट ची यशस्वी सुरुवात झालेली आहे. नाशिक विभागातील 267 शाखा डाकघर यामुळे डिजिटल झालेली आहेत.

खेडेगावात बचतीचे व्यवहार,विम्याचे,मनी ऑर्डर तसेच टपाल वितरणाचे काम होते.यापूर्वी हा सर्व डेटा तालुक्याच्या सिन्नर ऑफिस ला अपडेट केला जात असे. दर्पण प्रोजेक्ट अंतर्गत खेडेगावातील शाखा पोस्टमास्तर (BPM )यांना आरआयसीटी (RICT)उपकरण तसेच विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे उपकरण दिले गेली आहेत.

मागील ६ महिन्यापासून आरआयसीटी (RICT) मशीनवर सर्व बचतीचे ,विम्याचे(PLI/RPLI), टपाल वितरणाचे काम पूर्णपणे ऑनलाइन होत आहेत. रजिस्टर,स्पिडपोस्ट बुक झाल्यापासून तर ते वितरणकरे पर्यंतचा सर्व प्रवास हा ऑनलाइन ट्रॅक व ट्रेस होत आहे. त्यामुळेेे ग्राहक समाधानी आहे, यापूर्वी स्पीड पोस्ट हि सुविधा फक्त मुख्य पोस्टातच उपलब्ध होती, परंतु आरआयसीटी ( RICT ) मशीन वर ऑटोमेटेड बुकिंगची पण सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण/खेडेगावातील लोकांना स्पीड पोस्ट सेवेचा लाभ गावातच घेता येणार आहे. या मशीन मध्ये पोस्ट कामकाजा संदर्भातील वेगवेगळी अप्लिकेशन्स इन्स्टॉल केलेली आहे.

मनरेगा तसेच सामाजिक सुरक्षा यांचे पैसे डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर द्वारे खातेधारकाच्या खात्यात जमा होत असून त्याचे त्याचे यशस्वी भुगतान देखील या आरआयसीटी (RICT) मशीन च्या साहाय्याने सुलभ झालेले आहे.

खऱ्या अर्थाने खेडेगावातील पोस्ट ऑफिसेस डिजिटल होत आहेत.यामुळे पोस्टाच्या गुणवत्तेत,कार्यक्षमतेत वाढ होणार असून ग्राहक वर्गाला मोठा फायदा होणार आहे.वेळेत,चांगल्या व कटिबद्ध सुविधा मिळाल्यामुळे पोस्टाच्या ग्राहक वर्गात भर पडत आहे.

दर्पण प्रोजेक्ट मूळे शाखा डाक घरातील सर्व व्यवहार ऑनलाइन झालेली आहे. पोस्टाच्या तसेच सरकारच्या सर्व योजना तळागाळात पोहोचण्यास मदत होणार आहे.यामुळे पोस्टाच्या महसुली उत्पन्नात वाढ होणार आहे.सर्व जनतेने पोस्टाच्या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.                                                                                                                                                                            -आर डी तायडे, प्रवर डाक अधीक्षक, नाशिक विभाग

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!