चौथ्या सोमवारचा पर्वकाळ साधत त्रंबकनगरीत भाविक वाढण्याची शक्यता

0

ञ्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी : ञ्यंबकेश्वर येथे रविवारी भाविकांची गर्दी वाढली असून चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवारचा पर्वकाल साधण्यासाठी भाविक मोठया संख्येने हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त होत आहे. तिस-या सोमवारी आपेक्षीत गर्दी झाली नाही.

खंबाळा पार्कींगचा धसका घेतलेले भाविक तीन वर्षांपासून तीस-या सोमवारी येणे टाळत आहेत.शनिवार आणि रविवार मंदिरात भाविकांची संख्या लक्षणीय होती.दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

खासगी वाहनांची संख्या देखील अधिक होती.याचा फायदा वाहन प्रवेश फी वसुली करणा-या ठेकेदारास होत आहे.नगर पालिकेने हमखास उत्पन्न देणा-या वाहन प्रवेश फी वसुलीचा ठेका दिला आहे.शहरातील सर्व प्रवेश मार्गावर हा टोल वसुली करण्यासाठी कामगार नेमण्यात आले आहेत.

वाहन प्रवेश फी वसुली केली जाते मात्र शहरात आलेली वाहने उभीकरण्यासाठी वाहनतळावर जागा नसते आणि सुविधांचा अभाव आहे. शहरात वाहनचालक पाहिजे तसे वाहन उभे करून जातात.त्यामुळे ठिकठिकाणी वाहन कोंडी होत असते.

LEAVE A REPLY

*