सावधान ! गुंडांचे फेसबुक, व्हॉटसअप फ्रेंड पोलिसांच्या रडारवर

0

नाशिक, ता. १५ : कुणी सराईत गुन्हेगार किंवा रेकॉर्डवरील गुंडाचे आपण सोशल मीडियावर मित्र असाल, तर सावधान.

नाशिक पोलिसांतर्फे अशा गुंडांच्या सोशल मीडियावरील मित्रांवरही नजर ठेवण्यात येत असून याबाबत एक लिस्टही तयार करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आज शहरातील अनेक पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोऱ्या आणि फसवणुक प्रकरणी पोलिसांना हवे असलेल्या संशयितांना मुद्देमालासह अटक करण्यात आली.

त्याच अनुषंगाने पुढील तपास करण्याच्या दृष्टीने सोशल मीडियाच्या फ्रेंडलिस्टवर नजर ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर पोलिस आयुक्त पत्रकारांशी बोलत होते. अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पाहा.

LEAVE A REPLY

*