गंगापूर रोडवरील वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

0

नाशिक । प्रतिनिधी
गंगापूररोडवारील उच्चभ्रू वसाहतीत फ्लॅटमध्ये साडी विक्री सेंंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर शहर पोलिसांनी सोमवारी (दि.4) सायंकाळच्या सुमारास छापा टाकला. याठिकाणी झालेल्या कारवाइर्अतर्गत 4 तरुणींसह एका व्यक्तीस ताब्यात घेतले गेले. याप्रकरणी पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूररोड परिसरात शहर पोलिसांनी चार दिवसांत दुसर्‍यांदा अशी कारवाई केली. राजू वैद्यनाथ यादव (28, तिवंधा चौक, जुने नाशिक), रोहिणी सीताराम गांगुर्डे (जुना गंगापूरनाका) अशी या प्रकरणी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुना गंगापूर नाका परिसरातील आनंदकुंज इमारतीतील तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घरगुती पद्धतीने साडी विक्रीचा व्यवसाय सुरू होता. मात्र साडी विक्रीच्या नावाखाली तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली. आज साायंकाळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, उपनिरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. वेश्याव्यवसाय चालवणार्‍या महिलेसह चौघींना आणि एका दलालास ताब्यात घेतले. यावेळी फ्लॅटमध्ये नव्या साड्यांचे बॉक्स आढळून आले.

बेडरूमध्ये चार मुलींसह एक पुरुष बसलेला पोलिसांना आढळला. यावेळी पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता देहविक्रीचा व्यवसाय येथे सुरु असल्याचे समोर आले. पोलीसांनी दलालांना अटक करून4 तरूणींची सुटका केली. दलालांविरोधात पिटाअंतर्गत गुन्हा ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

तरिही व्यावसाय सुरूच
मागील वर्षभरात शहर पोलिसांनी गंगापूररोड, कॉलेजरोड परिसरात मोहीम राबवून अनधिकृत स्पा, तसेच मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसांयावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. काही पोलीस अधिकार्‍यांनाही हे प्रकरण भोवले होते. असे असतानाही कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरात देहविक्रयचा व्यवसाय इतर व्यवसायांच्या नावाखाली सुरूच असल्याचे समोर येत आहे.

LEAVE A REPLY

*