Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पोलीस दलांना होमगार्डचे ‘बळ’; जिल्ह्यात एक हजार होमगार्ड राहणार कार्यरत

Share

नाशिक। खंडू जगताप
लोाकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचार्‍याचे संख्याबळ अपुरे पडत असून पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी शासनाच्या मंजुरीने पोलीस आयुक्तालयास 400 तर ग्रामीण पोलीस दलास 700 असे 1 हजार 100 होमगार्डसचे बळ जिल्ह्यातील पोलीस दलांना मिळणार आहे.

अपुरे बळ, रिक्त जागा, बारा बारा तास काम, कायम ताण तणाव, कामाचा बोजा, सुट्ट्यांची बोंब, व्हीआयपी दौरे, निवडणुका यांमध्ये दिवसरात्र धावपळ यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणा कायम तणावात काम करत आहे. शासनाच्या निर्णयाने आता पोलीस दलांना दिलासा मिळणार आहे.

शहर पोलीस आयुक्तालयात 13 पोलीस ठाणी असून 3 हजार पोलीस अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. तर जिल्ह्या ग्रामीण पोलिस दलात 40 पोलीस ठाणी असून साडेतीन हजार कर्मचारी तैनात आहेत. परंतु शहर तसेच जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस बळ अतिशय कमी आहे. पोलीस दलातील रिक्तपदेही भरण्यात आलेली नाहीत. यामुळे कमी पोलिस कर्मचार्‍यांमध्ये काम सुरू आहे. तर दुसरीकडे होमगार्डसची संख्या मोठी असून त्या तुलनेत त्यांना वर्षभर काम मिळत नाही.

होमगार्डला वर्षभर काम द्यावे अशी मागणी होमगार्डच्या वतीने शासनाला सातत्याने करण्यात येत होती. अखेर यामध्ये समन्वय साधत शासनाने राज्यातील सर्व जिल्हा पोलीस दले व आयुक्तालयांना होमगार्डसची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहर पोलीस दलासाठी 700 होमगार्डसची मागणी करण्यात आली होती. पैकी 400 होमगार्डस देण्यात आले आहेत. तर जिल्हा पोलीस दलाने 1 हजार होमगार्डसची मागणी केली होती. त्यांना 700 होमगार्डस देण्यात आले आहेत.

देण्यात आलेले होमगार्ड हे प्रत्येकी 2 महिने कार्यरत राहणार आहेत. यानंतर त्यांची बदली दुसर्‍या दलात करण्यात येणार असून या पद्धतीने जिल्ह्यातील सर्व होमगार्डला संधी देण्यात येणार आहे. पोलीस दलास देण्यात आलेले होमगार्ड हे प्रत्येक पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, राखीव दले यांना विभागून देण्यात येणार आहेत.

त्यांचा उपयोग वाहतूक व्यवस्था, न्यायालय तसेच आवश्यक तेथील कायम बंदोबस्त, कैदी पार्टीची ने-आण, राजकीय दौरे, आंदोलने तसेच इतर बंदोस्तासाठी करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पोलीस दलास सहाय्य
शहर पोलीस आयुक्तालयाने 700 होमगार्डसची मागणी केली होती. पैकी 400 मंजूर करण्यात आले आहेत. हे सर्व प्रशिक्षित असून पोलीस दलांप्रमाणे यांचीही भरती प्रक्रिया व प्रशिक्षण असते.तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील प्रचार सभा, मतदान, मतमोजणी यामध्ये त्यांचा चांगला उपयोग झाला आहे. त्याच प्रमाणे पोलिसांच्या दैनंदिन कामकाजातही त्यांचे मोठे सहाय्य होणार आहे.
– पौर्णिमा चौघुले, पोलीस उपायुक्त, प्रशासन

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!