14 लाखांच्या चोरीचा 12 तासात तपास; नाशिक पोलिसांची कामगिरी, मुद्देमाल हस्तगत

0
नाशिक | मुंबईनाका परिसरात राहणारया फिर्यादीच्या विश्वासाचा फायदा घेवून त्यांच्याच कारचालकाने फलॅटमध्ये ठेवलेले 35 तोळे सोने व 15 किलो चांदी अशी एकुण 14 लाख रूपये किमतीचा मुददेमाल चोरला होता. याबाबत फिर्यादी प्रतिभा चांडक यांनी फिर्याद दाखल केली होती.

सदर गुन्हयाचा तपास पालिसांनी जलदररित्या करून 12 तासांच्या आत चोरटयाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून संपुर्ण मुददेमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस आयुक्तांसह नाशिक शहर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील,सहायक पोलिस आयुक्त डॉ राजू भुजबळ, वरीष्ठ पोलिस निरिक्षक सिताराम कोल्हे, तसेच सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या पथकाने तातडीने तपास करून ठेंगोडा, सटाणा येथील रहिवासी असलेला चालक नितीन यादव याला लगेचच त्याच्या मुळगावी जावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 35 तोळे सोने तसेच 15 किलो चांदीदेखील हस्तगत केली आहे.

सदरची कारवाई सरकारवाडा पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील सहायक पालिस निरीक्षक सारीका अहिरराव, भालेराव, हवालदार पळशीकर, पोलिस नाईक वाघमारे, ठाकुर, मरकळ, शेळके, जगदाळे, संगम भोये, खडके आदींनी केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अहिरराव करीत आहेत.

LEAVE A REPLY

*