Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक शहर पोलीस निरीक्षकांची खांदेपालट

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील १५ पोलीस निरीक्षकांची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज खांदेपालट केली. प्रशासकीय कारणास्तव या पदस्थापना करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश आज दुपारी काढण्यात आले.

यात गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांची भद्रकाली पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली झाली आहे. तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांच्याकडे सरकारवाडा पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली आहे. तसेच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक देवराज बोरसे यांच्याकडे सायबर पोलीस ठाण्याचा भार देण्यात आला आहे.

यांसह मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांची गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलीस निरीक्षकपदी जबाबदारी देण्यात आली आहे.

तर शहर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अशोक साखरे हे पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असतील. तसेच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांची शहर वाहतूक शाखेत तर विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडे मध्यवर्ती गुन्हेशाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील हेमंत सोमवंशी हे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील. तर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक फुलदास भोये हे गुन्हे व विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांचे वाचक म्हणून काम बघतील. दरम्यान, सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे हे आता म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील.

तर साजन सोनवणे हे मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असतील. तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव हे आता शहर वाहतूक शाखेत कार्यरत होतील. भद्रकाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंचल मुद्गल हे गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील. तसेच नियंत्रण कक्षातील दत्तात्रेय पवार हे विशेष शाखेत रुजू होतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!