Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक पोलिसांचा फिटनेस समजणार एका क्लिक वर; मनगटी घड्याळाच्या माध्यमातून ‘हायटेक टेक्नोलॉजी’चा...

नाशिक पोलिसांचा फिटनेस समजणार एका क्लिक वर; मनगटी घड्याळाच्या माध्यमातून ‘हायटेक टेक्नोलॉजी’चा वापर

नाशिक। दि. १५ प्रतिनिधी

अभिनेता अक्षय कुमार व दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमिटेड यांच्यावीने आरोग्य विषयी माहिती देणारे अत्याधुनिक मनगटी घडयाळ ‘गोकी’ चे पोलीसांना वाटप करण्यात आले. करोना व्हायरस चा प्रादुर्भाव सर्व जगभर पसरलेला असुन भारतात पर्यायाने महाराष्ट्रात संपुर्ण लॉकडाऊन करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

त्याच पार्श्वभुमीवर नाशिक शहरात देखील संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले असुन याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची आहे. त्यांना देखील कोरोणाची लागण होण्याची दाट शक्यता लक्षात घेता पोलीस आयुक्त, विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सर्वाना सॅनीटायझर, फेस मास्क, हैंडवॉश, विटामीन सी च्या गोळया, होमिओपॅथीच्या गोळ्या तसेच ग्लुकॉन-डी, चे
वाटप केलेले आहे.

तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना पिण्यासाठी गरम पाणी मिळावे याकरीता एक लिटर क्षमतेचे फ्लास्क देखील नुकतेच वाटप करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन त्यांची शारीरीक क्षमता आणि स्वास्थ्य याबाबतची दैनंदिन माहिती  रोजच्या रोज समजावी या दृष्टीकोनातुन ” गोकी ” हे मनगटी घडयाळाचे आज वितरण करण्यात आले.

हे घडयाळ रोजच्या रोज आपल्या शरीराचा रक्त दाब, आपल्या शरीराचे तापमान, आपण किती चाललो आणि आपल्या किती कॅलरीज बर्न झाल्या याबाबतची माहिती आपल्याला देते. सदरचे मनगटी फिटनेस घड्याळ हे प्रसिध्द अभिनेते आणि “गोकी”चे ब्रॅन्ड अॅम्बॅसेडर तसेच भारतीय  सुरक्षा यंत्रणांना सतत मदत करणारे अक्षय कुमार यांनी ५०० घड्याळ आणि दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमिटेड यांनी २७०० घड्याळे पुरस्कृत केलेली आहेत.

या घडयाळाचा लाभ आयुक्तालयातील २२५ अधिकारी व ३००५ कर्मचारी यांना मिळणार आहे. आज प्रातिनिधीक स्वरुपात अधिकारी आणि कर्मचारी यांना पोलीस आयुक्त नागरे पाटील यांच्या हस्ते फिटनेस बॅन्ड “गोकी” मनगटी घड्याळ वाटप करण्यात आले.

या प्रसंगी दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमीटेड चे व्यवस्थापकीय संचालक राजन दातार आणि संचालक स्नेहा दातार , पोलीस उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, विजय खरात, पौर्णिमा चौगुले, प्रभारी सहायक आयुक्त मनोज करंजे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या