Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांची रामशेज किल्ल्यावर भेट

Share

नाशिक : पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी रविवारी (दि. २५) रामशेज किल्ल्यास भेट दिली. यावेळी त्यांनी अजिंक्य किल्ले रामशेजची पाहणी केली. दरम्यान कुटुंबासह सहकारी पोलीस अधिकारी, मित्र परिवार उपस्थित होते.

दरम्यान शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे राम खुर्दळ यांनी किल्ल्याची माहिती देत किल्ला संवर्धनासाठी नाशिक पोलिसांनी योगदान द्यावे अशी विनंती केली. यावेळी पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी सांगितले कि, महिन्यातून एक मोहीम पोलिसांकडून करण्यात येईल. तसेच पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी दुर्गसंवर्धन मोहिमेत सहभागी होतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

त्यावेळी खुर्दळ यांनी रामशेज किल्ल्याचे महत्व उलगडून सांगितले. किल्ल्याच्या सर्व बाजूंच्या अभेद्य कांतीव कड्यांची, किल्ल्यावरील विविध वास्तू विविध रचनेचे टाके, सैनिकांचे सरदारांचे पडके वाडे, घरे, शस्रगार, चुन्याचा घाणा, टेहळनी बुरुजे, गुप्तमार्ग, राम मंदिर, त्यामागील गुप्त मार्ग तळे, गोमुखी दरवाजा, देवीमंदिर, किल्ल्याचे तट, बुरुजे, गोमुखी भव्य द्वार, पूर्वेकडील दम दमा बांधणीचा डोंगर, मुख्य प्रवेशद्वार, शिलालेख ऐतिहासिक, पर्यावरणीय माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच आयुक्त नांगरे पाटील यांना ‘गडकोट आपुले जीव कि प्राण’ ही पुस्तिका भेट देण्यात आली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!