Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पोलीस भरती २०१९ : उद्यापासून अर्ज प्रक्रियेला सुरवात; ‘या’ निकषांमध्ये बदल

Share

नाशिक : उद्यापासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु होत आहे. ३ सप्टेंबर पासून ते २३ सप्टेंबर २०१९ पर्यंत रात्री वाजेपर्यंत चालू असणार आहे. दरम्यान या पोलीस भरतीत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

दरम्यान चार हजार जागांसाठी ही पोलीस भरती करण्यात येत आहे. यामध्ये महत्वपूर्ण बदल म्हणजे शारीरिक चाचणी हि ५० गुणांची करण्यात आली आहे. तर बौद्धिक चाचणीला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. बौद्धिक चाचणी ही १०० करण्यात आली आहे. याआधी पोलीस भरतीत शारीरिक गुण मिळवणारा उमेदवार निवडला जायचा. परंतु या निकषामुळे महत्वपूर्ण बदल होणार आहे.

स्मार्ट गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी स्मार्ट पोलिसांची कुमक आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गुन्हेगाराच्या कुठल्याही गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसही तितकाच स्मार्ट असायला हवा, चोरांप्रमाणे आपली व्यवस्थाही मोल्ड होणं गरजेचं आहे. त्यामुळे यंदाच्या पोलीस भरतीत शारीरीक चाचणीपेक्षा बौद्धिक चाचणीला महत्व प्राप्त झाले आहे.

शारीरिक चाचणी परीक्षेतील बदल
पुरुष उमेदवार
१६०० मीटर धावणे – ३० गुण
१०० मीटर धावणे – १० गुण
गोळा फेक – १० गुण

महिला उमेदवार
८०० मीटर धावणे – ३० गुण
१०० मीटर धावणे – १० गुण
गोळा फेक – १० गुण

दरम्यान पोलीस भरतीच्या ४७६५ जागा असून यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या ३१४० जागा तर पोलीस चालक पदाच्या १६२५ जागा आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!