Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शरद पवार यांना पाकिस्तान जवळचा वाटतो, त्यांची मर्जी – पंतप्रधान मोदी

Share

नाशिक : देशातील प्रत्येकजण सोबत आहे मग काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत का नाही, शरद पवार हे अनुभवी नेते आहेत परंतु त्यांना पाकिस्तान जवळचा वाटतो हे आपले दुर्दव आहे, अशी आगपाखड पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

दरम्यान महाजनादेश यात्रेच्या समारोप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांवर टीका करत काश्मिरबाबत अपप्रचार करत असून त्यांच्याकडून हि अपेक्षा नाहीय. ‘

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रहिताचे वक्तव्य करताना दिसत नाहीत. मात्र शरद पवार अनुभवी असून देखील मतांसाठी चुकीचे वक्तव्य करतात, तेव्हा फार वाईट वाटते. शरद पवारांना पाकिस्तान चांगला वाटतो. तेथील शासनकर्ते चांगले वाटतात परंतु जगला माहितीय कि, दहशतवादाचा कारखाना कुठे आहे’, असे मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले कि विरोधकांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे देश बदनाम होत असून अशा गोडबोल्या लोकांमुळे देशाच्या प्रगतीला अडथळा निर्माण होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!