Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांना आशीर्वाद द्या- पंतप्रधान मोदी

Share

नाशिक : मुख्यमंत्री फडणवीस यांना नमन करण्यासाठी मी आलो असून पुन्हा एकदा देवेंद्र यांना आशीर्वाद द्या असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

दरम्यान महाजनादेश यात्रेच्या समारोप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधा मोदी यांनी सप्तशृंगीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील नाशिककरांना नमस्कार करत मराठीतून भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले कि लोकसभा निवडणूक होत्या तेव्हा दिंडोरीत अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला होता आज नाशिकमध्ये असा प्रतिसाद मिळत आहे. तसेच शिवरायांचे वंशज उदयन राजे भोसले यांनी माझ्या डोक्यावर छत्र ठेवले आहे असल्याचे त्यांनी सांगितले

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमला प्रतिसाद देण्यासाठी आपण सर्वजण आला आहात, हे महाजनादेश यात्रेचं यश असून आगामी निवडणुकांना असाच जनतेचा आशीर्वाद मिळेल. ते पुढे म्हणाले कि गुजरात हा महाराष्ट्रचा लहान भाऊ असून जनता जनार्दनच्या आशीर्वादाने सर्वात जास्त काळ मला गुजरातमध्ये सेवा करण्याची संधी दिली. महाराष्ट्राच्या विकासाची कथा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता पुन्हा एकदा भरगोस आशीर्वाद देतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!