Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

राजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदीना घातलेली पगडी “पिंपळगावची’

Share

पिंपळगाव बसवंत : महाजनादेश यात्रेत उदयन राजे भोसले यांनी पंतप्रधान मोदी यांना शाही पगडी भेट दिली. दरम्यान हि पगडी पिंपळगाव येथील योगेश डिंगोरे यांनी तयार केली आहे.

दरम्यान नाशकात आज भाजपच्या महाजनादेश यात्रेचं समारोप होता. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला उपस्थित होते. नव्यानेच भाजपात प्रवेश करणारे उदयन राजे भोसले देखील या सभेला आवर्जून उपस्थित होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर आले असता राजेंनी आणलेली शाही पगडी पंतप्रधान मोदी यांना घालण्यात आली.

हि शाही पगडी पिंपळगाव येथील असून योगेश या तरुणाने एका दिवसात ही पगडी तयार केली आहे. साधारण (दि. १८) खा .उदयनराजे भोसले यांचे मेव्हणे रत्नशिल राजे यांनी या ठिकाणी येऊन पागडीची ऑर्डर दिली होती. पंतप्रधान मोदींना सदरची पगडी भेट देण्याचे ठरले असल्याने त्याच रात्री अडीच वाजता तयार करून दिली.

दरम्यान अत्यंत सुंदर पणे बनविलेली पगडी असे या पगडीचे कौतुक खुद्द पंतप्रधान यांनी केले आहे. विशेष म्हणजे या पगडी मुळे योगेश डिंगोरे हा सर्प मित्र असल्याने पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याने त्यास सकाळी सात वाजताच ओझर विमानतळावर राहण्यासाठी सांगितले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!