Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देशात चार लॉजीस्टिक हब पैकी एक नाशकात होणार – पंतप्रधान मोदी

Share

नाशिक : देशात चार लॉजीस्टिक हब पैकी एक हब नाशकात होणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली.

महाजानदेश यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, डिफेन्स इनोव्हेशन हब या मालती लॉजीस्टिक प्लॅनमध्ये नाशिक समावेश करणार असून चार हबपैकी एक हब नाशिकला करणार आहे. तसेच २०२२ पर्यंत प्लास्टिक मुक्त भारत, घर घर जल आणि सागरमाला प्रोजेक्टमधील एक हिस्सा महाराष्ट्रासाठी असणारा असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान त्यांनी सांगितले लवकरच नाशिकचा समावेश रामायण सर्किटमध्ये करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवारबाबत ते म्हणाले कि सतरा हजार पेक्षा अधिक गावांना लाभ मिळाला असून येणाऱ्या काळात अधिक व्यापक अभियान राबविण्यात येणार आहे. लवकरच महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र हेरिटेज टुरिझम साकारण्यात येणार आहे

तेपुढे म्हणाले कि, आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील नागरिकांच्या खात्यात १५०० कोटी रुपये वाटप करण्यात आले. तसेच शौचालय, वीज घराघरात पोहोचवले असून आता पाणी पोहोचविणार असल्याने त्यावर जोरदार काम सुरू केले आहे. राज्यातील शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन आदिवासींसाठी एकलव्य मॉडेल विकसित केले आहे.

भारतीय लष्करावर स्तुतीसुमने उधळताना ते म्हणाले कि, भारतीय लष्कराला बुलेट फ्रुफ जॅकेट बनवले जात असून त्याची मागणी वाढली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!