Type to search

नाशिक

प्रधानमंत्री आवास योजनेत नाशिक अव्वल; १२ पुरस्काराचे मानकरी

Share

नाशिक : प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्याला आज मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक प्रमोद पवार यांनी हा सन्मान स्वीकारला. नाशिक जिल्ह्यासह चांगले काम तालुक्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्ह्याला प्रधान मंत्री आवास योजनेत विविध श्रेणीत ३ तर तालुक्यांना ९ असे तब्बल १२ पुरस्कार मिळाले.

प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत आज सिडको भवन बेलापूर, मुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यात घरकुल योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांना व तालुक्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात ऑगस्ट अखेर २२१४१ घरकुल पूर्ण करून राज्यात पहिल्या क्रमाकावर असलेल्या व बांधकाम टक्केवारीत राज्यात द्वितीय क्रमांक असेलल्या नाशिक जिल्ह्यास सन्मानित करण्यात आले. तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेत ऑगस्ट अखेर ४४०१ घरकुल बांधकाम करून दिलेल्या योगदानाबाबतही सन्मान करण्यात आला.

तसेच राज्यात पूर्ण घरकुलांच्या टक्केवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नाशिक तालुक्यास, राज्यात २००० पेक्षा जास्त घरकुल पूर्ण करणाऱ्या तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, दिंडोरी, सुरगाणा, कळवण, विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल मालेगाव तालुक्यास, पूर्ण घरकुलांच्या संख्येनुसार राज्यातील पहिल्या १० मध्ये असलेले जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड व बागलाण या तालुक्यांमधील गट विकास अधिकाऱ्यांना राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांनी प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केले.

प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम सुरु असून घरकुल बांधकामात नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात १० हजारापेक्षा जास्त बांधकाम करणाऱ्या जिल्ह्यामध्ये नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. प्रधान मंत्री आवास योजनेत गेल्या चार महिन्यांपूर्वी देशात २२५ क्रमांकावर असलेला नाशिक जिल्हा आता ३८ व्या क्रमांकावर पोहचला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!