Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पंतप्रधानाच्या सभेवर पावसाचे सावट

Share

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शहरात महाजनादेश यात्रेचा समारोपासाठी येत आहेत. या निमित्त शहरात टू व्हीलर रॅली व रोडशोचे आयोजनही करण्यात आले आहे. थोड्याच वेळात या महाजानदेश यात्रेला सुरवात होणार असून स्कायमेट या वेधशाळेने शहरात पावसाची शक्यता वर्तविली आहे.

दरम्यान स्कायमेट या खाजगी हवामानशास्र विभागाने नाशिकसह राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे दुपारनंतर होणाऱ्या बाईक रॅली व रोडशोवर पाऊस कोसळतो कि काय अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार असल्याची माहिती या वेधशाळेने वर्तविली आहे. आज होणारी महाजनादेश यात्रा व पंतप्रधान मोदी यांची उद्या होणारी सभा पावसामुळे स्थगित नाही होणार ना अशी धास्ती शहरातील पदाधिकाऱ्यांना पडली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्याचा समारोप करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार होते. परंतु हवामान विभागाने पाऊसाचे संकेत दिल्याने हि सभा रद्द करण्यात आली होती. यावेळी स्कायमेट या वेधशाळेने नाशिकमध्ये पावसाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पाऊसाचा अंदाज खरा ठरणार कि अंदाजच राहणार हे लवकरच कळणार आहे.

हवामान विभागाचे अंदाज चुकीचे ठरत असून यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर याचा परिणाम होत आहे. याचा प्रत्यय पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावरही याचा परिणाम दिसून आला. त्यामुळे हवामान विभागाने योग्य ती माहिती नागरिकांपर्यंत पुरवावी अशी अपेक्षा आहे.
-किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ, नाशिक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!