Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : इच्छुकांच्या बॅनरबाजीवर बुलडोझर; स्वागताची तयारी पाण्यात

Share

नवीन नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली असून यामुळे अनधिकृत असणाऱ्या होर्डिंग्स प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. दरम्यान पाथर्डी फाटा, राणेनगर येथील अनधिकृत होर्डिंग्स मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने काढण्यात आली आहेत.

दरम्यान उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि (दि. १८) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या निमित्ताने शहरात पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्वागताची जोरदार बॅनरबाजी केली आहे.

परंतु अनधिकृत ठिकाणी तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने पालिकेने ही होर्डिंग काढण्यास सुरवात केली आहे. यामुळे काही ठिकाणी मनपा अधिकारीव नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्रही पाहायला मिळाले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!