Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : सभास्थळाला छावणीचे स्वरूप; पाच हजार पोलीस तैनात

Share

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनदेश यात्रा तर उद्या (दि.१९) होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शहरात होत आहे. या पार्श्वभूमीवर तपोवन परिसर, मुंबई आग्रा महामार्गाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

उद्या (दि. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी महाजनादेश यात्रेच्या समारोपाला नाशिमध्ये येत आहेत. यापार्श्वभूमीवर तपोवन परिसर, मुंबई आग्रा महामार्गाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ठिकठिकाणी सुरक्षेसाठी वाहनांची तपासणी सुरू आहे.

तर दुपारी १ वाजेपासून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा देखील आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक नियोजन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे -पाटील करत असून यासाठी राज्यभरातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. दरम्यान नाशिक पोलीस आयुक्तालयातून अडीच हजार पोलिस तर परराज्यातून १ हजार ८०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलं आहे.

तसेच सभास्थळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून सभेला येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. परराज्यातून आलेल्या पोलिसांच्या निवासाची व्यवस्था तपोवन परिसरातील लॉन्समध्ये करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने नंदुरबार, नगर, पुणे येथील डॉग स्कोड व बॉम्ब शोधक पथके शालिमार परिसरात दाखल झाले आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!