Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : पंतप्रधानाच्या सभेला गर्दी जमण्यास सुरवात; आदिवासी नृत्याने होतेय स्वागत

Share

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. १९) नाशिक येथे महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर कालपासून सभास्थळी जोरदार तयारी सुरु आहे. थोड्याच वेळात या सभेला देखील सुरवात होणार आहे. दरम्यान या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या स्वागत आदिवासी नृत्याने करण्यात येणार आहे.

सभास्थळी गुजरात-सापुतारा आदिवासी कलापथक माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे. गर्दी जमण्यास सुरवात झाली असून महाराष्ट्रातून भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत. तसेच सभास्थळी ॲम्बुलन्स, जेवणाचे स्टॉल, व्हीआयपीसाठी खास पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

(सर्व फोटो : देशदूत चमू )

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रा शहरभर फिरली. तसेच या महाराष्ट्रभर चाललेल्या यंत्राचा समारोप हा नाशिक शहरात होत आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक शहरात येत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!