PhotoGallery : सभास्थळी व्हीव्हीआयपींची प्रवेशावरून हमरीतुमरी; काळ्या कपडयांनाही परवानगी
Share

नाशिक : महाजनादेश यात्रा समारोप कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नाशकात दाखल होत आहे. या निमित्ताने सभास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून या ठिकाणी काळे कपडे, छत्र्या, रेनकोट वाल्यांनाही प्रवेश देण्यात आला आहे. व्हीव्हीआयपींमधून प्रवेश घेणाऱ्यांची अचानक गर्दी वाढल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून यामुळे नियोजन व्यवस्था कोलमडली आहे. तिकडे प्रवेशावरून आमदार सीमा हिरे आणि पोलिसांचा वाद झाल्याने समर्थकांनी धक्का बुक्की केल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान भाजप कार्यकर्ते ताठ पदाधिकाऱ्यांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. आता सभास्थळी गर्दी वाढू लागली आहे. महत्वाचे म्हणजे नागरिकांना पोलीस सोडत नसल्याचा आरोप करण्यात आहे. तसेच छत्री, काळे कपडे, रेनकोट, हेल्मेट नेण्यास बंदी करण्यात आली होती परंतु मात्र खुर्च्या भरत नसल्याने सर्वांनाच परवानगी देण्यात आली आहे.आहे.
यावेळी नागरिकांची तपासणी करताना तपासणी गेटच चिखलात अडकले असून यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत जाण्यासाठी शुभम पार्क येथे महिलांनी केलेली तयारी, सभास्थळी जाण्यास गर्दी हाेत आहे.