Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : पितृपक्षात गंगावाडीत भरते कावळ्यांची जत्रा

Share

नाशिक | संदिपकुमार ब्रह्मेचा :

पितृपक्ष म्हटलं की कावळ्यांची आठवण येते. पितृपक्षात आपल्या पूर्वजांना नेवैद्य दाखविण्यासाठी नागरिकांची गंगेवर प्रचंड गर्दी होत असते. असेच एक ठिकाण गंगापूर गावाच्या नजीक गंगावाडी येथे आहे. जिथे पितृपक्षात चक्क कावळ्यांची जत्राच भरलेली असते.


गंगावाडीच्या संगमेश्वर मंदिराच्या परिसरात एक नव्हे दोन नव्हे तर शेकडो कावळ्यांची गर्दी दिसते. त्यामुळे पितृपक्षात नेवैद्य दाखविण्यासाठी नागरिकांची येथे मोठी गर्दी असते. मंदिराच्या परिसरात कावळ्यांची संख्या बघून येथे येणारा प्रत्येक व्यक्ती अचंबितच होतो.

मंदिराच्या परिसरात महादेवाच्या मंदिरा सोबत प्राचीन कालभैरव, प्राचीन हनुमान, प्राचीन दत्ताचे देखील मंदिर आहे .

तसेच मंदिराचा संपुर्ण परिसर वड, पिंपळ, आंबा झाडांनी नटलेला आणि बहरलेला आहे. त्यामुळे येथील वातावरण देखील निसर्गरम्य आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!