Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : पितृपक्षात केळीच्या पानांना मागणी का? जाणून घ्या

Share

नाशिक | श्वेता खोडे : पितृपक्ष सुरु होऊन काही दिवस झाले असून बाजारात केळीच्या पानांना विशेष मागणी आहे. कारण पितृपक्षात जेवणासाठी केळीची पाने वापरली जातात. त्यामुळे बाजारात मागणीबरोबर पानाच्या किंमतीही वाढल्या आहेत.

दरम्यान पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान करून श्राद्ध घालण्याची प्रथा आहे. याच पंधरवड्यात घराघरांत विविध पदार्थ तयार केले जातात. सात ते आठ भाज्यांचा समावेश या स्वयंपाकात केला जातो. त्यासोबतच भाज्या, खीर, वडे, कढी, कोशिंबीर आदी पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थाना नेहमीच्या ताटात बसवणे शक्य नसल्याने साहजिकच केलीच पानांचा वापर केला जातो.

साधारण त्र्यंबकेश्वर -इगतपुरी या भागातून पानांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरातील सराफ बाजार, दहीपूल, फूलबाजार, गोदाकाठचा बाजार, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा या ठिकाणी ही पाने उपलब्ध होतात. १० पानांची एक जुडी याप्रमाणे जुड्या बांधून ठेवल्या जातात.

सध्या पानांची आवक वाढली असून ग्राहकांचा प्रतिसादही वाढला आहे. परंतु विक्रेते वाढल्याने बाजारावर परिणाम झाला आहे. एका पानाची किंमत १० रुपयापासून ते ४० रुपयांपर्यंत किंमत असून दिवसभरात एक किंवा दोन जुड्या विकल्या जात आहेत.                            -सोमीबाई, विक्रेते

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!