Photo Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

शहरातील गोदावरी नदी परिसर, रामकुंड, लक्ष्मण कुंड, दहीपूल, तांबट गल्ली, मेन रोड, शालीमार, गाडगे महाराज पुतळा, यशवंतराव महाराज पटांगण, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, सराफ बाजार, द्वारका हा परिसर अतिशय वर्दळीचा असतो. दररोज हजारो पर्यटक, प्रवासी आणि नागरिकांची याठिकाणी नेहमीच वर्दळ दिसून येते.

मात्र, गेल्या काही दिवसांपसून करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही वाहतूक या रस्त्यांवरून होत नाहीये. त्यामुळे संपूर्ण शहर ओस पडलेले दिसून येत आहे. अनेकजण एवढं शांत नाशिक कधीही बघितले नव्हते.  अशाच काही शब्दांत प्रतिक्रिया देतात. असेच आपला रोजचा वावर असलेला हा परिसर सध्या कसा असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. निर्मनुष्य परिसर, एकही दुकान उघडे दिसत नाही. आलीच तर एखादी पोलीस गाडी येताना दिसते. असे आठवणीत राहणारे नाशिक टिपले आहे या फोटोगॅलरीमध्ये.

वरील सर्व ठिकाणचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत विरू कदम यांनी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *