Type to search

इंदिरानगर : पांडवलेणी येथे अडकलेल्या दांपत्याची सुखरूप सुटका

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : पांडवलेणी येथे अडकलेल्या दांपत्याची सुखरूप सुटका

Share

इंदिरानगर वार्ताहर : पांडवलेणी येथे ट्रेकिंग करायला गेलेले दांपत्य डोंगरावर अडकल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप खाली आणले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पांडवलेणीच्या निसर्गरम्य वातावरणात ट्रेकिंग करण्यासाठी अशोका मार्ग येथे राहणारे शामकांत प्रभाकर पाटील वय (४६) व त्यांची पत्नी विद्या पाटील वय( ३५) रा मातोश्री बंगला अशोका मार्ग हे दोघे दाम्पत्य, नातेवाईक व मित्रमंडळी सोबत सकाळी आठ वाजेच्या सुमारास पांडवलेणी येथील डोंगरावर फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यावर ते खाली उतरत असताना यावेळी पाटील दाम्पत्याला डोंगर सर करण्याचा मोह झाला.

पांडवलेणीच्या पाठीमागील भागातील डोंगर त्यांनी चढण्यास सुरुवात केली. मात्र डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर जमिनीच्या दिशेने पुन्हा जाण्याचा मार्ग धुसर दिसू लागल्याने त्यांचे डोळे गरगरू लागल्याने चक्कर येण्यास सुरुवात झाली. त्यांना उतरण्याचा मार्ग सापडेना अखेर त्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांचे नातेवाईक असलेले पोलिस अधिकारी बोरसे यांच्याशी संपर्क साधला.

यावेळी संबंधित पोलीस अधिकारी यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सांगळे यांच्याशी संपर्क साधून माहिती कळविली सांगळे यांनी त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षातून महापालिका आपत्ती निवारण कक्ष नवीन नाशिक उपकेंद्राला माहिती कळविण्यात आली.

माहिती मिळताच नवीन नाशिक अग्निशमन विभागाचे जवान पांडवलेणीच्या दिशेने रवाना झाले. तसेच इंदिरानगर गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक विकास लोंढे, भगवान शिंदे, रमेश टोपले, रियाज शेख घटनास्थळी पोहोचून पाटील दाम्पत्याला सुखरूप डोंगरावरून खाली उतरविण्यात यश आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!