Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ : बदली रोखण्यासाठी शिक्षिकेने रचला लुटीचा बनाव

Share

पेठ : बदली होत नसल्याने प्रशासनास करणे दाखवण्यासाठी एका शिक्षिकेने लुटीचा बनाव रचला. परंतु तपासाच्या पहिल्याच टप्प्यात बनवेगिरी उघड झाल्याने महिला शिक्षिका गोत्यात सापडली आहे. सुनंदा नामदेव लांडगे असे शिक्षिकेचे नाव आहे.

दरम्यान शिक्षिकेने कथन केलेली माहिती अशी कि, नुकतीच शिक्षिकेची बदली इगतपूरी तालुक्यातून पेठ तालुक्यातील चिखली शाळेवर झाली. नेहमीप्रमाणे काल शाळेवर जात असतांना सकाळी १० वाजेचा सुमारास पळशी चिखली रोडवर स्प्लेंडर गाडीवरील दोन व्यक्तींनी आपली गाडी अडवुन आपले गळ्यातील सोन्याची पोत, पायातील चांदीची जोडवी तसेच रोख ३ हजार रूपयांची लुट केल्याची कैफीयत पोलीस ठाण्यात केली.

महिला शिक्षिकेवर दिवसाढवळ्या लुट केल्याचा प्रकार तालुक्यात घडत असल्याने इतर शिक्षकही चक्रावुन गेले. माहिती मिळाल्यानंतर लागलीच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी करण्यास सुरवात केली. तपास करत असतांना अशा पद्धतीच्या घटनेचा कोणताही धागा जुळत नसल्याने पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास करताच विसंगत माहिती आढळून आली.

घटनास्थळावरील परिस्थिती जुळून येत नसल्याने पोलिसी खाक्या दाखविताच आपली बदली इगतपूरी तालुक्यातून पेठ येथे झाल्यामुळे लुटीचा बनाव केल्याचे शिक्षिकीने उघड केले. दरम्यान पेठ तालुक्यात बदलीचे झाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे बदली रद्द करण्यासाठी प्रशासनाकडे कारण दाखविणेसाठी लुटीचा प्रसंग उभा केला व तक्रार मागे घेत असल्याचे या शिक्षिकेने सांगितले.

या प्रकारामुळे नोकरशाहीची मानसिकता अधोरेखीत होत असुन ज्यांनी विद्यार्थांना आदर्शाचे धडे द्यायचे त्यांनीच असे बनाव करूण ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित ठेवण्यासाठी व आपल्या सोयीसाठी बनाव करायचा हा विरोधाभास अनाकलनीय आहे .

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!