वाहकाकडून अपंग महिला प्रवाशास अवमानकारक वागणूक 

0

पेठ : पेठ आगाराच्या पेठ- जळगाव बसने करंजाळी येथून प्रवासासाठी बसलेल्या मंजुळा चौधरी या अपंग माहिलेस अपमानास्पद वागणूक देऊन करंजाळी ते नाशिक या प्रवासासाठी अंपगाची सवलत योजने अंर्तगत १५ रूपये तिकीट असतांना प्रत्यक्षात ३५ रुपयाचे तिकीट आकारून तसेच अत्यंत असभ्य भाषा वापरून अपमानीत केल्याचा प्रकार घडला आहे.

 

खाजगी प्रवाशी वाहतुकीने एसटी महामंडळास जोरदार टक्कर देऊन विकलांग केलेले असल्याने एसटी प्रवाशांस वेगवेगळी योजना, सुविधा देऊन एसटीकडे प्रवाशी आकृष्ठ करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून जोरदार प्रयत्न करण्यात येतात . मात्र एसटी प्रवासात प्रवाशांचा थेट संपर्क येतो  वाहक ,चालकांशी त्यामुळे वरिष्ठस्तरावरूण त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असते. मात्र काल दि. २८ रोजी पेठ आगाराच्या सकाळी ९ वा. सुटणाऱ्या पेठ -जळगाव गाडीत अपंग माहिलेच्या बाबतीत असा प्रकार घडलेला असल्याने या प्रकाराची दखल एसटीचे अधिकारी घेतील काय? व प्रवाशांना सन्मानाची वागणूक मिळूण एसटी पासून दुरावलेले प्रवाशांना न्याय मिळेल काय, तसेच खरंच प्रवाशी खऱ्या अर्थाने सवलत घेत असताना स्वतः जवळ सवलत कार्ड बाळगतात का यावरही लक्ष देणे आवश्यक आहे.

चौकशी करुन कारवाई होइल – आगार प्रमुख   

या प्रकाराबाबत आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साथला असता झालेला प्रकार समजला असुन अपंगाना २५% सवलतीने तिकीट आकारणी करणे ऐवजी ५० % प्रमाणे तिकीट आकारणी करणे चुकीचेच आहे . मात्र संबधीताचे जबाब घेऊन कारवाई करण्यात येईल असे अश्वासन देण्यात आले .

LEAVE A REPLY

*