Type to search

नाशिक

पेठ मार्गावरील मोटर सायकल अपघातात १ ठार, २ गंभीर जखमी 

Share

पेठ : नाशिक-पेठ मार्गावरील पेठ शहरातील शनिमंदीराजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन १ ठार तर दोन गंभीर जखमी झाले .

या बाबतचे वृत असे की नाशिक पंचवटीतील शिवाजी चौकातील जितेंद्र चंद्रकांत कोडीलकर हे आपला भाचा शुभम देवरे याचे समवेत नाशिकहून वापी ( गुजरात ) येथे जाणेसाठी ड्रिम युगा मोटरसायकल क्रमांक एमएच १५ जीडी ०८९३ ने जात असता पेठ पासुन २ कि मी वरिल जाधवपाडा जवळ पेठकडून नाशिककडे जाणारी पेठ तालुक्यातील उस्थळे येथील विजय हिरामण पाडेकर वय २३ व रोहीदास त्र्यंबक भोये २४ यांची मोटरसायकल पल्सर क्र. एमएच १५ सी क्यु ७६०८ याची समोरासमोर धडक झाली.

डोक्यास मार लागलेले जितेंन्द्र कोडविलकर यांच्यावर पेठच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच निधन झाले . तर जखमी विजय पाडेकर व रोहीदास भोये यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नाशिकला रवाना करण्यात आले.

नाशिक पंचवटीत पंचवटी अक्वा नावाने पाणी जारचा व्यवसाय करणारे जितेंद्र कोडीलकर वापी येथे व्यावसायीक कामानिमीत निघाले असतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली . या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असुन पो . नि .लिलाधर कानडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोउनि विजय साळी पुढील तपास करीत आहेत .

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!