Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : सोशल मिडीयामुळे महिलेसह मुलांना मिळाले हक्काचे घर

Share

पेठ : पेठ-हरसुल यांच्या सिमारेषेवरील बोरीपाडा येथील महिला आपल्या दोन अपत्यासह सोशल मिडीयामुळे घरी आली आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून या महिलेचा तपास लागल्याने घरच्यांनी लागलीच नागपूर गाठवून महिलेस घरी आणलं आहे. त्यामुळे सदर व्हिडीओ तयार करणाऱ्या वाव महिलेस मदत करणाऱ्या युवकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

दरम्यान दोन वर्षांपूर्वी काहीशी गतिमंद असणारी ही महिला आपल्या दोन मुंलासह घराबाहेर पडली होती. यानंतर कालावधीत ती थेट नागपूरात पोहचली. मात्र अनोळखी परिसर, परिचयाचे कुणी नाही तसेच अशिक्षित असल्याने ओळख देण्यात असमर्थ असल्याने आपल्या दोन अपत्यासह दारोदार भटकत होती. यावेळी या या महिलेस सावनेर भागातील हितेश दादा बनसोड या कुटुंबीयांनी घरात आसरा देऊन आपुलकीने विचारपूर केली.

अनोळखी भागातही आपुलकीने गतिमंदतेवर मात करत जुजबी ओळख सांगितलयाने तात्काळ हितेश यांनी व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यामुळे व्हिडिओला शेअरिंग मिळाल्याने व्हिडीओ नाशकात पोहचला. यावेळी पेठ येथील लोकांनी हा व्हिडीओ बघितल्याने त्यांनी तात्काळ महिला ओळखली.

त्यामुळे दिरंगाई न करता महिलेच्या घरच्यांनी नागपूर येथे जाऊन गतिमंद महिलेला कुटुंबाने जवळ घेतेले. अशावेळी स्थानिक नागरिक भावुक झाले होते. हितेश बनसोडे यांनी सदरचे माहिलेबाबतची माहिती व्हॉटसअप द्वारे प्रसारीत करूण महिलेस व तिचे मुलींना त्यांच्या आप्तस्वकीयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

सोशल मिडीयाने, मोबाइलमुळे पिढी बर्बाद झाल्याची ओरड अगदीच अनाठायी नसली तरीही त्याचा सामाजीक कार्यासाठी योग्य वापर केल्यास काय परिणाम दिसून येतो त्याचे हे आदर्श उदाहरण आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!