Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ : शहरानजीकच्या अपघातात दोन युवकांचा मृत्यु

Share

पेठ : शहरानजीकच्या शासकीय विश्रामगृहानजीक पेठ गावातील डोंगरदेवाची माऊलीचा कार्यक्रम आटोपून कोटंबी गावाकडे परतणाऱ्या दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिलीप वसंत गाढवे (वय २२ रा .धोंडमाळ) व शंकर हरीशचंद्र पोटिंदे (वय१९ रा . कोटंबी) अशी मृत झालेल्या युवकांची नाव आहेत.

अधिक माहिती अशी, पेठ शहरात माऊलीच्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील युवक कार्यक्रम संपून गावाकड मोटर सायकल क्र एम .एच .१५ , इके ६४०६ या क्रमांकाच्या वाहनाने परतत असताना हा अपघात घडला. रात्री ११ .३०ते १२ वाजे दरम्यान नाशिककहून गुजरात राज्यात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या युवकांच्या दुचाकीस धडक दिली. अपघातील युवकांना रस्त्याच्या बाजुला असलेल्या खोल खड्ड्यात टाकण्यात येउन अज्ञात वाहन धारकाने पोबारा केल्याची माहीती मिळाली आहे.

यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनधारकाने घडलेला प्रकार जवळील ग्रामस्थांना कळविला. यानंतर पोलिसांनी माहीती देण्यात आली.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन धारकाविरुद्ध विरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन सपोनि . संदीप वसावे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कासम शेख, खिरकाडे आधिक तपास करीत आहेत .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!