Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ : रस्त्याचे दुरावस्थेमुळे कोटंबी घाटात वारंवार ‘ट्रॅफीक जाम’

Share

पेठ : नाशिक मार्गावर रस्त्याचे कामे अर्धवट स्थितीत असल्याने पेठ आंशिक रस्ता चिखलयुक्त झालेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहनांच्या रांगा लागल्या असून चिखलामुळे वाहनांना येण्या जाण्यास त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान नाशिक ते सुरत असा हा मार्ग जात असल्याने या ठिकाणी अवजड वाहने दिसून येतात. परंतु रस्ता खराब झाल्याने येथे वाहतूक खोळंबत असल्याचे चित्र दिसत आहे. कधी सावळघाट तर कधी कोटंबी घाटात वाहनांच्या रांगा तासनतास अडकुन पडत असल्याने या मार्गावरुण प्रवास करणे रामभरोसे ठरत आहे.

विशेष करून गुजरात राज्यातून लांबपल्ल्याच्या गाडयांमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरावस्था झाली असून प्रशासनास जग कधी येणार असा प्रश्न सध्या प्रवाशांना पडत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!