Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ : नायब तहसीलदारास सहा हजाराची लाच घेताना अटक

Share
राहुरी खुर्द येथील महावितरण कार्यालयासमोर प्रस्तावित उपोषण मागे घेण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांना तीन लाखांची खंडणी मागणार्‍या एका जणावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पेठ : वडिलोपार्जित शेतजमिनीचे हिस्से-वाटप चे प्रकरण पुर्ण करुन देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नायब तहसीलदारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. बाळासाहेब भाऊराव नवले (वय- ५४) असे अटकेतील नायब तहसीलदाराचे नाव आहे. पेठ येथील ग्रामस्थाच्या तक्रारीवरुन सदर कारवाई करण्यात आली.

अधिक माहिती अशी कि, तक्रारदाराने आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीचे हिस्से-वाटप चे प्रकरण तहसील कार्यालयात टाकले होते. दरम्यान हे काम काम पूर्ण करण्यासाठी नायब तहसीलदार नवले यांनी तक्रारदारकडे ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने धाडस दाखवत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, भाकर कारभारी निकम पोलिस निरिक्षक तसेच सापळा पथकाचे अधिकारी पो.ना. वैभव देशमुख, पो.ना. नितीन काराड़, पो.ना. शाम पाटील, चालक पो.हवा. संतोष गांगर्डे यांनी सापळा रचला. दरम्यान (दि. ३०) रोजी तक्रारदाराकडून ६ हजारांची रोख घेताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!