Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ : सोशल नेटवर्कींग फोरमच्या माध्यमातून कोळुष्टी टँकरमुक्त

Share

पेठ : एका बाजूला दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात पाणी मिळवण्यासाठी गावखेड्यातील लोकांना दुष्काळाचा भयाण सामना करावा लागत आहे. तर एकीकडे ऐन ऊन्हाळ्यात आपल्या दारात पाणी आल्याने पेठ तालुक्यातील कोळुष्टीचे ग्रामस्थ मात्र आनंदाने जल्लोष करत आहेत. नाशिक येथील सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून हि किमया साध्य झाली आहे.

नुकतेच हा पाणी प्रकल्पग्रामस्थांकडे सुपूर्द करण्यात आला. अमेरिकेतून आलेले उद्योजक श्री. वसंत राठी, किशोर राठी, डाॅ. अभिजीत राठी यांच्या हस्ते या पाणी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी वसंत राठी म्हणाले की, लहानपणी येवला येथे वास्तव्यास असतांना दुष्काळाशी दोन हात आम्हीही केले होते. विदेशात व्यवसायासाठी रहात असताना सोशल फोरमच्या माध्यमातून कोळुष्टी सारख्या दुर्गम भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मदत करता आली. आज या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघणे हा आयुष्यभरासाठी अमूल्य ठेवा आहे असे श्री. वसंत राठी यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.

गेल्या कित्येक वर्षांपासून आम्हाला ऊन्हाळ्यात दोन तिन किलोमीटरवरून डोक्यावर पाणी आणावे लागायचे. आमचे हे कष्ट राठी बंधू आणि फोरमच्या लोकांनी वाचवले याबद्दल त्यांचे आभार कसे मानावे हेच कळत नाही ही ग्रामपंचायत सदस्या शेवंता बोरसे यांची प्रतिक्रियाही फोरमच्या सदस्यांना भारावून गेली.

गावकऱ्यांचे श्रमदान, टीम फोरमचे तांत्रिक ज्ञान, आणि लोकसहभागातून आर्थिक मदत या एसएनएफ पॅटर्नच्या त्रिसूत्रीतून हे काम पूर्ण करण्यात आले. अडव्हान्स एन्झाईम्स या कंपनीने कोळुष्टी पाणी प्रकल्पासाठी पावणेचार लाख रुपये देणगी दिली. ग्रामपंचायतनेही पाण्याची टाकी बांधली. सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नातून चार महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करुन अतिशय ऊत्साहात लोकार्पण करण्यात आले.

यावेळी फोरमचे सदस्य प्रमोद गायकवाड, इंजि. प्रशांत बच्छाव, रामदास शिंदे, संदिप बत्तासे, डाॅ. सोमेश्वर झाडबुके, डाॅ. योगेश जोशी, डाॅ. किरण गिते, पंकज अटल, खंडेराव डावरे, रमेश वळी, संदिप डगळे तसेच  सरपंच सौ. कमळाबाई दहावाड, ग्रामसेवक सिताराम कवर, सुरेश दहावाड, अमृत चौधरी, गोकुळ गावीत, काशिनाथ तिदमे, काळु गावीत, पुंडलीक बोरसे, अंबादास चौधरी, अंबादास भोये आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!