Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Deshdoot Impact : पेठ : भुवनघाटाने घेतला मोकळा श्वास; एकेरी वाहतूक सुरु

Share

कोहोर | वार्ताहर : पेठ तालुक्यात भूवनघाटा नजीक गत दहा ते बारा दिवसापासून घाटात दरड कोसळल्याने वाहतुक बंद होती. त्यामुळे तालुक्यातील पश्चिमकडील भुवन, आडगांव, धानपाडा, अंबापाणी, घोटविहिरासह हरसूल ते पेठकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करणे कठीण बनले होते.

यासंदर्भात गुरुवार ( दि.१५) रोजी दैनिक देशदूतने ‘ भुवन घाटात दरड कोसळल्याने मार्ग बंद ‘ अशा आशयाची बातमी प्रसारीत केली होती. याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागांनी घेताच, लागलीच भुवन घाटात दोन जेसीबी (बुलडोजर) पाठवून, घाटातील दगड-माती बाजूला करुन तात्पुरती एकेरी वाहतुक चालु केली.

गत झालेल्या मुसळधार पावसाने घाटातील डोंगर-दऱ्यात साचलेल्या पावसाने व भू-सख्खलाने दगड-माती व झाडा-झुडपे रस्त्यावर आलेली होती. त्यामुळे तालुक्याच्या मुख्यालयात येणेकामी अनेक गावांचा संपर्क तुटला होता. या घाटात दरवर्षी पावसाळ्यात पश्चिमेकडील पेठ ते हरसूल महत्वाचा मार्ग बंद होत असल्याने नागरिकांना प्रत्येकवेळी अडचणीना सामोरे जावे लागत आहे.

संबधित विभागाने मान्सूनपूर्व घाटातील उपाययोजना कराव्यात. अशी खंत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे अध्यक्ष गणेश गवळी, हरिदास भुसारे, ज्ञानेश्वर वाघेरे, संजय दूगल व स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!