Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ : सावळ घाटानजीक ४४ लाखांचा गुटखा जप्त

Share

पेठ : नाशिक मार्गावरील सावळ घाटानजिक गुजरातकडून नाशिककडे येणारा आयशरमधील विमल कंपनीचा तब्बल ४४ लाख ४० हजार रूपये किमतीचा गुटखा स्थानिक गुन्हा शाखेचे भरारी पथकाने पकडल्याने गुजरात-महाराष्ट्र असे कनेक्शन समोर आले आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षीका आरती सिंग जिल्ह्यातील महत्वाच्या मार्गावरील गस्ती वाढविण्यात आल्याने (दि .२७) रोजी गुजरात राज्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत पेठ -नाशिक मार्गाने गुटख्याची तस्करीची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षीका आरती सिंग, अप्पर पो. अधिक्षीका शर्मीष्ठा वालावलकर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेचे पो.नि.के.के. पाटील , स .पो.नि. सागर शिंपी यांचे पथकाने गुजरात राज्यातून येणारे संशयीत आयशर ट्रक क्र .एचएच ०२ ,ईआर५०१० याची तपासणी केली असता त्या मध्ये गोण्यांमध्ये भरलेला विमल पानमसाला आढळून आला.

वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. मात्र गुन्हा दाखल करण्याचे प्रकीयेत अन्न व औषध प्रशासन यांचा अहवाल महत्वाचा दुवा असल्याने त्यांना सकाळी ९वाजे दरम्यान कळविण्यात आले . मात्र तपासणीसाठी पथक सायंकाळी ५वाजे दरम्यान आल्यानंतर पुढील सोपस्कार पार पाडण्यात आले.

ट्रकमध्ये एकंदर ४० हजार आठशे विमल गुटख्याचे व तंबाखुचे पॅकेट हस्तगत करण्यात आले. या गस्तीपथकात पोउनि संजय पाटील , हवा . राजू दिवटे , प्रकाश तुपलोंढे, दिपक आहिरे, हनुमंत महाले, पुंडलीक राऊत, दत्तात्रय साबळे, पो. नाईक वसंत खांडवी, प्रविण सानप, अमोल घुगे जालींदर रवराटे, रमेश काकडे आदींचा समावेश होता .

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!