Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ : धरणात बुडून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

Share

नाशिक : पेठ तालुक्यातील आसरबारीजवळील हरणगाव येथील धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच मुलींपैकी एकीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दुपारी तीन वाजता घडलेल्या या घटनेतील बुडालेल्या मुलीचा मृतदेह शाेधण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू हाेते. यात मयत झालेल्या मुलीचे वडील तुकाराम जाधव हे कल्याण येथे पाेलिस दलात कार्यरत आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, रविवारी दुपारी तीन वाजता आसरबारी येथील पाच मुली धरणात कपडे धुण्यासाठी गेल्या हाेत्या. कपडे धुवून झाल्यानंतर या पाचही मुली पाेहण्यासाठी धरणात उतरल्या.

यातील जयश्री कमलाकर भुसारे, साक्षी कमलाकर भुसारे (१४) या दाेघी बहिणींसह त्याच्या नात्यातीलच ज्याेती तुकाराम जाधव (१२), अर्चना तुकाराम जाधव (१६) व दीक्षा तुकाराम जाधव (११), यांचा समावेश हाेता. यापैकी साक्षी व ज्योती यांना पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी पाण्यात बुडाल्या. यावेळी धरणावर उपस्थित असलेल्या देवानंद गायकवाड या बारा वर्षीय मुलाने तात्काळ साक्षीला पाण्याबाहेर काढले.

साक्षी व जयश्री या दिंडाेरी तालुक्यातील सादराळे या गावातील रहिवासी हाेत्या. सुटीनिमित्त त्या मामाकडे येथे आल्या हाेत्या.

ही घटना गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर गर्दी केली. यातील ज्योती हिला वाचविण्यात अपयश आले. याबाबत पाेलिस पाटील गेणुदास जाधव यांनी पेठ पाेलिस ठाण्यात माहिती दिली. रात्री आठ वाजता मृतदेह हाती लागला. पेठ पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नाेंद करण्याचे काम सुरू हाेते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!