पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलगा पाटात वाहून गेला

0

विखरणी वार्ताहर : पाटोदा येथे बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा पाटात वाहून गेला असून शोधकार्य सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पाटोदा येथील आडगाव रस्त्यावर आण्णासाहेब तनपुरे यांची वस्ती असून शेजारीच पालखेड कालवा आहे.

सध्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी असून आज पोळा असल्याने दुपारी बाराच्या सुमारास बैलाना घेऊन गोकुळ आण्णासाहेब तनपुरे (१७) हा पाटाच्या कडेला बैल धूत होता मात्र अचानकपणे एका बैलाने गोकुळला पाटाच्या पाण्यात ओढले असता त्यास पोहता येत नसल्याने पाण्यात प्रवाहात वाहून गेला.

ग्रामस्थांमार्फत शोधकार्य चालू :

सोबत लहान मुले असल्याने त्यांनी हा प्रकार घरच्यांना सांगितल्या नंतर शोध सुरू झाला मात्र साडेतीन तास उलटूनही कोणताही तपास लागू शकलेला नाही पाटात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते, मात्र आता पाटाचे पाणी इतरत्र वळवण्यात आले असून ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोधकार्य सुरू आहे.

गोकुळ हा लासलगाव येथील महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून त्याची गणना होते. येवला तालुका पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे या घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती देण्यात आली. अद्यापही प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी उपलब्ध झालं असून नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

*