Type to search

Breaking News गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

पारावरच्या गप्पा : अहंकाराच इसर्जन व्हणार….

Share

( गावातली चार पाच मंडळी मंदिरात बसलेली; गणपती विसर्जनाची बैठक )

दाम्या : रखमे ..व्हाईस ..म्या जरा देवळात जाऊन येतुया …काहीतरी महत्वाची चर्चा हाय …
रखमे : व्हय व्हय… तुमच्याबिगर मिटिंग व्हनार न्हाय य जाऊन तुम्ही … आलं मोठं मिटिंगवाल…

(मंदिरात समदी जण बसलेली )
पाटलाच्या तुक्या : व्हय र पोराओ, काय ठरिवलंय मग गणपती इसर्जनाचं ?
रंग्या : काय येगळं करायचं ? जे दरवर्षी करतुया तेच करायचं अन काय?
तुळश्या : अर तसं नव्ह ..म्हणजे सरकारनं मूर्ती पाण्यात टाकायला मनाई केलीया..
दाम्या : अर मग असू देकी ..मनाई गावाकडं कसली आलिया मनाई ..

पाटलाच्या तुक्या : तुमची डोकी फिरलीय का? आर आपण इकोफ्रेंडली गणपती बसवलाय .. मग इसर्जन बी तसंच करावं लागलं.
भग्या : खर हाय तात्या, तसच करूया … इसर्जन महत्वाचं
तान्या : तात्या फकस्त गणपतीचं इसर्जन न्हाय तर आपल्या गावात गट पडलेत, भावबंध एकात एक न्हाय, आमच्या पोरासोरांच्या बी टोळ्या पडल्यात … त्याच बी इसर्जन व्हायला हवं …

भग्या : खरं हाय तान्या , ह्या भांडणांपायी गावाचं वाट्टोळं व्हतं चाललंय ?
पाटलाच्या तुक्या : खरं हाय पोराओ … आमच्या मोठ्या माणसांच्या भांडणात तुम्हीबी ओढले जातात… पर यंदाच्या गणपतीत इसर्जन हे गणपतीचं न्हाय तर आपल्यातील अहंकाराचे इसर्जन कराया हवं ..

बाळ्या : तात्या मला, माफ करा, माझ्यापायी गावाला लय भोगावं लागलं.. यापुढं कामधंदा करिन पर गावची अब्रू जाऊ देणार न्हाय …
पाटलाच्या तुक्या : अर, बाळ्या , तु माफी मागितली हेच गावासाठी लय झालं. …
या इसर्जनात आपल्यातील कटुता, खोटेपणा इसर्जित करून गावच्या इकासासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करा, काय मंडळी पटतय का?
तुळश्या : व्हय तात्या, आपल्या गावाचा विकास म्हणजे आपला विकास ..
( हो, हो गावचा इकास व्हायला हवा … )

भग्या : चला समद्यांनी, आरतीला यायचं आहे. … तसेच इसर्जनाची समदी तयारी झाली हाय.. औंदा आपण गणपती इसर्जन करणार नसून तर फक्त शाडूची मूर्ती विसर्जित करणार आहोत. सोबत तात्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्यातील अहंकार विसर्जित करणार आहोत.. चला तोपर्यंत, सर्वानी गणपतीचा आनंद घ्या …
तुळश्या : बोला , गणपती बाप्पा मोरया …. ( सगळे घराकडे मार्गस्थ होतात...)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!