Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

पारावरच्या गप्पा | भाग -५ : पूरग्रस्तांना आधार देऊया; माणुसकीचे दर्शन घडवूया…

Share

(पारावर पाटलाचा तुक्या, रंग्या, दाम्या, काश्या, तुळश्या ही मंडळी चर्चा करत बसलेली … )

पाटलाचा तुक्या : काय र पोराओ, झाली का मी भात लावणी..
गुणा : झाली तात्या, हा पाऊस बी काही काम करू देईना झालाय..

दाम्या : हवं तात्या, तिकडं सांगली -कोल्हापुरात म्हण लय धुमाकूळ घातलाय
रंग्या : व्हय तर म्या बी टीव्हीवर बघितलाय .. लयच बेकारी हाय राव.
पाटलाचा तुक्या : अरे, दोन्ही शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातलाय , आता कुठं पाणी निवळायला लागलाय..

काश्या : व्हय तात्या, म्हा पोरगंबी त्या व्हाटसप का काय त्याच्यावर दावीत व्हता ..लय भिशान परिस्थिती हाय?
पाटलाच्या तुक्या : व्हय पोराव असं दिस कुणाच्याच वाट्याला न येवो.. समद चित्र टीव्हीवर पाह्यलं म्या…. तरीच राज्यातील समदी लोक मदतकार्याला लागलीयत ..

तुळश्या : तात्या, आपल्या गावातुनबी काहीतरी मदत पाठविणार हायती ?
पाटलाच्या तुक्या : व्हय व्हय ..आपल्याच न्हाय, समद्या राज्यातून माणूस एकवटालाय ..त्यास्नी मदत करायासाठी…
रंग्या : व्हय पर आता कूड पुराचं पाणी कमी व्हया लागलंय .. तवा समदी मदत लवकरच पोहचायला पाहिजे.

पाटलाच्या तुक्या : तुझं बरोबर हाय रंगा पर पाणी कमी झाल्या बिगर काय बी करता इयाचं न्हाय ?
दाम्या : पर तात्या मला एक प्रश्न पडलाय ? सरकारची मदत कूड दिसना ? ते फकस्त मिलेट्रीवाल अन बाकीची मंडळी हाय ?
पाटलाचा तुक्या : व्हय बराबर म्हणतुया.. अर सरकारचं डोकं ठिकाणावर हाय का? म्हण दोन दिवस पुराच्या पाण्यात जो कोणी राहील त्यालाच मदत दिली जाईल. असं कूड कायदा असतो व्हय.. ?

तुळश्या : अन म्या हे बी ऐकलं कि ह्या सरकारनं जे गहू -तांदूळ दिल ..त्यावर म्हण आमदार, खासदार, अधिकाऱ्यांचे फोटू लावल्यात ?
पाटलाच्या तुक्या : व्हय तुळश्या, अर हे सरकार पूरग्रस्तांना मदत करायची सोडून स्वतःचीच जाहिरात करतंय.. अशा बिकट परिस्थितीत तरी सामान्य माणसाला हात द्या, बरं सगळेच सारखेच … आज देश एवढ्या मोठ्या संकटात असतांना यांना हे सुचतंय तरी कसं ?
दाम्या : तात्या समदं राजकारणी सारखंच , टाळूवरचे लोणी खाणारी जमात
रंग्या : खरं हाय गड्याहो तुमचं एवढं मोठं संकट असतांना राजकारण्यांनी असं वागणं शोभत नाही. आज संबंध राज्यातून लोक मदतीला धावून आलेत अन याचे हे न पटण्यासारखं आहे…..

काश्या : आरं गावाकडं एखाद माणूस आजारी जरी असलं तरी गावातील शंभर लोक विचारपूर करायला जातात… अन इथं ही मंडळी पुरात अडकलेल्या लोकांना मदत करायचं सोडून व्हाट्सअप वर व्हिडीओ काढत बसल्यात..
पाटलाच्या तुक्या : गड्याहो समदं खरंय … चला इतरांसारखं गप्पा मारण्यापरीस गावांतून वर्गणी गोळा करू अन पूरग्रस्तांना पोहचवू … तेवढंच माणूस म्हणून आपलॆ जबादारी पार पाडू ..

समदी मंडळी : व्हय तात्या … चला नुसत्या हे करू ते करूच्या गप्पा न करता आपल्या पद्धतीने काय मदत होईल ती करू ….
(समदी जण मारुती मंदिराकडे जातात… )

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!