Friday, April 26, 2024
Homeनाशिकभद्रकाली : डिंगर आळी खून प्रकरणातील चौघे संशयित जेरबंद

भद्रकाली : डिंगर आळी खून प्रकरणातील चौघे संशयित जेरबंद

नाशिक । भद्रकाली परिसरात झालेल्या खून प्रकरणातील चौघा संशयितांना शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. तीघांना मुंबई तर एकास शहरातून ताब्यात घेण्यात आले. या खूनाचे कारण पुर्ववैमनस्य असून कुठल्याही प्रकारचे टोळी युद्धाचा प्रकार नसल्याचा निर्वाळा परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांनी दिला.

सुशांत कैलास वाबळे (रा. म्हसरूळ टेक, जुने नाशिक), शंभू गोरख जाधव, शिवा गोरख जाधव (20,दोघे रा. रा.जाधव वाडा, मरीटेक, जुने नाशिक), भुषण जगदीश शिंदे (रा.हिरावाडी, पंचवटी) अशी पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्याचा राग मनात धरून जुने नाशिकमधील डिंगरअळी संभाजी चौकात शनिवारी (दि.9) मध्यरात्री विवेक शिंदे या युवकाला धारधार शस्त्राने हल्ला करून ठार करण्यात आले होते.

- Advertisement -

उपायुक्त तांबे यांनी दिलेल्या महितीनुसार, 2016 साली पंचवटी कॉलेजसमोर राहूल टाक नावाच्या युवकाची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. त्या गुन्ह्याची आणि शनिवारी घडलेल्या खूनाच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी व कारण समान असल्याचे तांबे यांनी सांगितले. गोळीबाराच्या गुन्ह्यात संशयित सुशांत कैलास वाबळे याचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला होता. तो या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला असताना त्याने पुन्हा संभाजी चौकात संशयित शुभम उर्फ शंभू गोरख जाधव, शिवा गोरख जाधव, भुषण जगदीश शिंदे यांच्या मदतीने विवेक सुरेश शिंदे याचा धारधार शस्त्रांनी खून केला होता.

पोलिसांनी तत्काळ सर्व सुत्र हलवत सुशांत वाबळेला पोलिसांनी जुन्या नाशकातच बेड्या ठोकल्या. मुंबईला गेलेल्या सहायक निरिक्षक राकेश हांडे, उपनिरिक्षक डी.बी.मोहिते, व्ही.एस.जोनवाल यांच्या पथकाने मुंबई येथून जाधव बंधु व जगदीश या त्रिकुटांना शिताफिने जेरबंद केले. दरम्यान रविवारीच अटक करण्यात आलेल्या सुशांत यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास गुरुवारपर्यंत (दि.12) पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरीत तिघांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या