पंचवटीत गाय आडवी आल्याने बस उलटली; प्रवाशी किरकोळ जखमी

0

नाशिक : दुचाकी आणि गाय आडवी आल्याने दिंडोरी रोड वरील मायको दवाखान्यासमोर नाशिक बस डेपोची बस उलटल्याची झाल्याची घटना सोमवारी (दि.15) सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

पंचवटीतील दिंडोरीरोडवर मायको दवाखान्याजवळ बसचा अपघात वणी गडाहून नाशिक कडे परतणाऱ्या बसचा अपघातात सहा ते आठ प्रवाशी जखमी झाल्याचे समजते.

सोमवार सायंकाळी वणी गडाहुन एसटी बस क्रमांक एमएच४०एन८८३२ ही नाशिककडे निघाली होती.सायंकाळी सहाच्या सुमारास मायको दवाखाना दिंडोरी रोड या ठिकाणी या एसटी बसला अचानकपणे दुचाकी आली. यावेळी दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात एसटीबस ही विजेच्या खांबावर जाऊन आदळली व पलटी झाली ,या खांबाजवळ बसलेली गाय मात्र या बसच्या खाली दबली.

या वेळी मायको दवाखाना परिसरातील स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. एस्टीबसच्या पुढील व मागची काच फोडून जवळपास पाच ते आठ प्रवाश्यांना वाचविण्यात यश मिळाले. या ठिकाणी दबली गेलेली गाय स्थानिक व वनजन्यप्राणी प्रेमी यांनी गाईस बाहेर काढले व उपचारासाठी घेऊन गेले. तसेच प्रवाशी व जखमी महिला एस एम ढेकणे राहणार उपनगर कंडक्टर यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

लक्ष्मीबाई घाटे (वय ६५), सुलोचना ससाणे (वय २०), रंजनाबाई घाटे (वय ३५), सुरेश घाटे (वय ४०), गणेश घाटे (वय १५), समाधान घाटे (वय १३), यादव पठाडे (वय ६०), ताईबाई पठाडे (वय ५५), सूर्यकांत ढेपले (वय ३०) इत्यादी जखमी असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*