Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | पंचवटी : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पंचवटीकर रस्त्यावर

Share

पंचवटी : पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी पंचवटीकर एकवटले असून आज सकाळी शहरातून मदतफेरी काढण्यात आली. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आवश्यक अन्नधान्य, औषधे व इतर साहित्याचे संकलन सुरू आहे. यावेळी महापौर, आमदार, स्थायी समिती सभापती, बाजार समिती सभापती, नगरसेवक, सर्वसामान्य नागरिक, सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

पश्चिम महाराष्ट्रात भीषण पूरस्थिती निर्माण झाल्याने पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी पंचवटीतील नागरिक तसेच लोकप्रतिनिधी एकत्र येत आज रस्त्यावर उतरले असून पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये अनेक नागरिक अडकले आहेत.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडल्याने पिण्याचं पाणी आणि अन्न देखील मिळाले नाही. त्यामुळे शहरातील विविध संस्था, संघटना एकत्र आल्या असून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वजण एकवटले आहेत. आज कित्येकांचे संंसार उघड्यावर पडले आहेत, त्यांच्या संंसारासाठी जगण्यासाठी एक मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन नाशिककरांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!