Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सराईत खंडणीखोरांची मार्केटमधून धिंड

Share

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी सकाळी तिघा संशयितांनी टमाटे व्यापारास बंदुकीचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची खंडणी मागीतली होती. यातील दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आज(दि.१७) दुपारी पंचवटी पोलिसांनी दोघा संशयितांची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून धिंड काढली.

काही दिवसांपासून मार्केट मध्ये सराईत गुन्हेगार हे व्यापारी, आडतदार आणि शेतकरी वर्गाला दमबाजी करून खंडणी वसूल करीत असल्याची चर्चा सुरू असताना सोमवारी राजेंद्र भागवत काटकर (वय.३५, रा.दत्तनगर, पंचवटी) या व्यापाऱ्यास मार्केट मध्ये असतांना संशयित सागर जाधव, कुणाल थोरात, सागर भडांगे यांनी गावठी कट्टा रोखत सायंकाळ पर्यत ५० हजार रुपयांची खंडणी दे अन्यथा तुझा गेम वाजवतो अशी धमकी दिली होती.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सागर जाधव, सागर भडांगे यास अटक केली होती. या दोघाची आज मार्केट यार्ड मधील सेलहॉल, आडत कंपन्या, अशा मार्केटच्या संपूर्ण परिसरातून पायी चालत धिंड काढली. यावेळी शेतकरी, व्यापारी, हमाल वर्गाने मोठी गर्दी केली होती.

यातील फरार कुणाल थोरात याचा देखील पोलीस शोध घेत असून यांच्यावर यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने पोलीसानी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाल सुरू केली आहे.

दरम्यान संशयितांची मार्केट मधून धिंड काढल्याने दहशतीखाली असलेल्या व्यापारी, शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले असून एक प्रकारे त्यांना धीर मिळाला असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे अशोक साखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर आदीसह पोलीस उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!