इतिहासाची साक्ष देत जव्हार नगरपरिषदेची ‘शंभरी’

0

नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळात असतांना तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील आणि नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी दुर्गम भागाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.

जव्हार संस्थानात तत्कालीन राजे श्रीमंत पाचवे विक्रमशहा ऊर्फ मार्तण्डराव मुकणे यांनी दूरदृष्टीने स्वातंत्र्य पुर्व काळात दिनांक १ सप्टेंबर १९१८ रोजी लोककल्याणकारी पाऊल उचलत जव्हार नगरपरिषदची स्थापना केली होती. म्हणजेच आज या घटनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत.

आजही हा वाडा ऐतिहासिक घटनांची साक्ष देत उभा आहे. आणि त्यामुळे येथे पर्यटक देखील मोठ्या संख्येने या राजवाड्याला भेट देत असतात. महाराष्ट्रात खूप कमी नगरपरिषदा आहेत की ज्यांनी १०० वर्षे पूर्ण केले आहेत. जुना राजवाडा १८२० साली आगीत जळाला. यात राजवाड्यातील ऐतिहासिक दस्तऐवज जळून खाक झाला होता. त्यावेळी हा राजवाडा कृष्णराजाने बांधला होता.

LEAVE A REPLY

*