Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पारावरच्या गप्पा : पक्षबदलाचं वारं… गावाकडं

Share
पारावरच्या गप्पा : शेतकरी, पीकविमा अन अधिकारी latest-news-nashik-disadvantages-of-farmers-in-removing-crop-insurance

( पारावर दाम्या , रंग्या, तान्या, काश्या, बाळ्या अन पाटलाच्या तुक्या काही तरुण पोरं बसलेली)

काश्या : काय बी म्हणा औंदाच इसर्जन एकदम भारी झालं बरका ?
बाळ्या : व्हय व्हय एकदम येगळंच ..
सम्या : हा मग आयडिया कुणाची व्हती .. आमच्या पोरांची …
तान्या : पुढल्या वरीस बी असंच करूया .. झ्याक कार्यक्रम झाला …

पाटलाच्या तुक्या : व्हय पोराओ तुमच्यामुळं असा कार्यक्रम पाहायला मिळाला.. बरं ते सरपंच कुठं दिसना ?
रंग्या : गेलं असतील … पक्ष बदलायला ? (समदीजण हसायला लागतात.)
पाटलाच्या तुक्या : म्हंजी पक्षांतराचं वारं ..गावाकडं बी आलं म्हणायचं … अर म्हणा हुरळून जाऊ नका.. गावचा इकास गावच्या पुढाऱ्यांनीच करा म्हणावं …
बाळ्या : बरोबर बोललात तात्या तुम्ही, समद्या देशभरात पक्षांतराचं वारं शिरलया…
पाटलाच्या तुक्या: अर पर आतापातुर ज्याचं खाल्लं त्यालाच डच्चू देयाचा … हे न्हाय पटत … कुणीतरी सांगितलय ..ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ..ते काय खोटं न्हाय ….
काश्या : व्हय तात्या … मागील निवडणुकीत बी आपण ठरविलत कि चुलीचा जो इचार करील त्याला निवडून देयाचा .. पर झालं उलटंच. पुढल्या निवडणुकीत बी असच झालं तर…

बाळ्या : कुणीच एका पक्षात टिकना झालंय … जो तो आपला स्वार्थ पाहण्यात गुंग झालाय…
पाटलाच्या तुक्या : यात सामान्य माणसांचीच परवड झाली. आपल्या सारख्याने काय करावं असा प्रश्न पडतो.
भग्या : तात्या , माझं एक म्हणणं हाय , अवं ज्या माणसांमुळं आज काही मंडळी आमदार , खासदार झाली, त्याच माणसाची आज परवड हाय .. अन आता..
बाळ्या : आता काय?
भग्या : आता जो तो पक्ष सोडून जातोय ..

सम्या : व्हय ना …आमच्या सारखे कार्यकर्ते आजपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलून देत नव्हते ..आज आमचाच नेता त्यांच्यात जाऊन मिळाला .. आम्हाला बोलायला जागा उरली नाही.
तुळश्या : हे म्हणजे असं झालं .. ज्यांच्या विरोधात आपण कालपर्यंत प्रचार केला.. आज त्यांनाच मतदान करा असे सांगत लोकापुढे जायचे का? लोक काय म्हणतील?
सम्या : काही नसते रे असे.. आपले काम काय, प्रचार करा, सतरंज्या उचला, बँनर लावा, पोलींग एजन्ट व्हा, साहेबाची गाडी आली मागं सुटा… बस..

पाटलाच्या तुक्या : पोराओ राजकारण सोडा, लोकशाही म्हटल्यावर हे चालूच राहणार…. पर त्यामुळं तुम्ही येगळं होऊ नका…गावात पक्ष पाडू नका… आजवर गावात पक्ष म्हणून कोणाकडं बघितलं न्हाय ..जो गावाचा इकास करील त्याला निवडून दिलया …औंदा बी तसच करू.. मग कोणी पक्ष बदलो आगर ना बदलो…. काय वाटत?

समदी जण : ( व्हय तात्या , अगदी खरं ..) क्रमश :

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!