Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ओझर : तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला मिळाले जीवदान

Share

ओझर : एचएलजवळ कुंपणाच्या तारेत अडकलेल्या बिबट्यास वनअधिकाऱ्यांना वाचविण्यात यश आले आहे. दरम्यान त्यास उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.

निफाड येथील साकोरे मिग जवळ HAL कंपनीचे रडार क्रमांक ३ लगत असलेल्या संरक्षक भिंतीलगत तुटलेल्या बोगद्यातून बिबट्या बाहेर येत असतांना तार कुंपणात अडकला. दरम्यान यासंदर्भात माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी चांदवड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पाहणी केल्यानंतर रेस्क्यू टीमसह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पवार व डॉ. चौधरी यांना बोलावण्यात आले. यांनतर अडकलेल्या बिबट्यास सुरक्षितरित्या बाहेर काढून HAL परिसरातील प्रथमोपचार करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!