Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

एचएएलचे साडे तीन हजार कामगार आजपासून संपावर

Share

नाशिक : ओझर येथील भारतीय वायू सेनेचा कणा म्हणून ओळख असलेल्या एचएएलच्या साडे तीन हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून देशभरातील २० हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

दरम्यान सुखोई विमान तयार करणाऱ्या हिंदुस्थान (एचएएल)मध्ये संपाला आजपासून सुरुवात होत आहे. भारतातील नऊ विभाग आज पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. भारताची हवाई सुरक्षा करणारे हेलिकॉप्टर्स आणि विमाने यांना तांत्रिक सुविधा आजपासून बंद होणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड या कंपनीत साधारण २० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी ही संपाची हाक दिली आहे.

अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेंड युनियनची प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी बंगळुरू येथे बैठक होती. या बैठकीदरम्यान व्यवस्थापनाबरोबर चर्चा फिस्कटल्याने नाशिकसह देशभरातील कामगार आजपासून संपावर जाणार असल्याची माहिती युनियनने दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!